धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव

धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

Updated: Sep 5, 2017, 11:16 PM IST
धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव  title=

धुळे : धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

चेतन नितीन पाटील असं या मुलाचं नाव आहे. चेतनच्या अकस्मात मृत्यूनं गावात शोककळा पसरलीय. यामुळे गावातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूकीच्या उत्साहावर विरजण पडले.

या घटनेनंतर वाजंत्री बंद करत गावातील सर्व गणपतीचं शांततेत अवघ्या दहा मिनिटांत पाझर तलावात गणपती विसर्जन करण्यात आलं.

बांधावर उभं राहून गणेश विसर्जन करतांना चेतन पाण्यात पडला. गाळात पाय रुतल्यानं त्याला पाण्याबाहेर पडणं अशक्य झालं. त्याच्याच वयाच्या मुलानं त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट तोच पाण्यात खेचला जात असल्यानं त्यानं प्रयत्न सोडला.

याशिवाय, पैठण तालुक्यातील बिडकीन इथं तीन, नाशिकमध्ये एक आणि बीड जिल्ह्यात एका मुलानं गणेश विसर्जना दरम्यान आपला जीव गमावला आहे.