Bharat Jodo Yatra : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात असून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप (BJP) आणि मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेत राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनं केली. भाजयुमोने पुण्यात काँग्रेस भवनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. (BJP protest in Pune) तर मुंबईतही आंदोलन, नागपुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तुषार गांधी भारत जोडो यात्रेत
दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी (Tushar Gandhi) आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे आज भारत जोडो यात्रेत देश वाचवण्याच्या ऐतिहासिक कार्यात एकत्र सहभागी झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचं तुषार गांधी यांनी समर्थन केलं. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागून त्यांच्याकडून पेन्शनही घेतली होती, यानंतर त्यांनी पुढील काळात इंग्रजांसाठी काम केलं असं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.
आज सत्य सांगायला आपण घारबलो तर सत्याशी दगाबाजी करण्यासारखं होईल असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. पुरोगामी विचारांच्या लोकांनी या यात्रेत सहभागी होणं गरजेचं असल्याचं तुषार गांधी यांनी सांगितलं.
सावकरांचे नातू करणार मोठा गौप्यस्फोट
दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) आज मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. संध्याकाळी पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुराव्यासह राहुल गांधी यांना उत्तर देणार आहेत. सावरकर स्मारकात पत्रकार परिषद घेत रणजित सावरकर राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार आहेत.
राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक
राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पुणे मुंबईत भाजपकडून निषेध करण्यात आला.. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आलं.. तसंच पुण्यातील काँग्रेस भवनात भाजपनं बॅनरबाजी केली.. तर इकडे मुंबईतही राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन केलं.. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते दादरमधील टिळक भवनाकडे जाणार होते.. मात्र पोलिसांनी दादर फुल मार्केटजवळच या कार्यकर्त्यांना रोखलं.. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तर नाशिकमध्येही भागूर येथे निदर्शने करण्यात आली...यावेळी सर्व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते...विशेष म्हणजे शिंदे गटाचे खासदार हेंमंत गोडसे यात सहभागी झाले...