मुंबई : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जरा शेतकऱ्यांना बसला आहे. तसंच तो सामन्यांनाही बसला आहे. परतीच्या पावसामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. मुंबईतील भाजी मंडईत भाज्यांची आवक ही कमी झाली आहे. पावसामुळे भाज्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. पावसामुळे गहू, चना, मिर्ची आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस अजूनही सुरु असल्याने भाजीपाला पिकांसह रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. धान्यासह भाजीपाला पिकांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी काढणीसाठी कापलेल्या तूर, हरभरा पावसात भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. तर शेतामध्ये उभा असलेलं पीक देखील जमीनदोस्त होत आहेत. अधून-मधून अचानक आलेल्या पावसामुळे शेतमाल खराब होण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली आहे.
वर्धा जिल्ह्यात कापूस, तूर या खरीप पिकांसह रब्बीतील चणा, गहू, कांदा यासह भाजीपाला यांना पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. पण आता याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील बसणार आहे.