पाच-सहा मोकाट गाईंचा महिलेवर हल्ला

पाच-सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला करून तिला जबर जखमी केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीये.

Updated: Apr 19, 2018, 04:15 PM IST

नाशिक : पाच-सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला करून तिला जबर जखमी केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीये. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन नाशिकमधल्या पाटील गार्डन जवळ निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा प्रकार घडलाय. बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवर समोरून आलेल्या पाच-सहा गायींनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या. जोशी यांच्यावर गायींनी हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं.