नाशिक हादरले! मद्यधुंद कारचालकाने चार, पाच जणांना उडवले

या घटनेमुळे नाशिक हादरले आहे.  कारने धडक दिल्याने चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Updated: Nov 17, 2022, 09:36 PM IST
नाशिक हादरले! मद्यधुंद कारचालकाने चार, पाच जणांना उडवले title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमध्ये(Nashik) एक खळबळजनक घटना घडली आहे. एका मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची(Drink and Drive) प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे.  कारने धडक दिल्याने हे सर्वजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

नाशिक-पुणे महामार्गावर हा विचित्र अपघात घडला आहे. कारचालक उपनगर वरून लेखानगर आणि त्यानंतर लेखानगर कडून मुंबई नाक्याकडे भरधाव वेगाने येत असताना ही घटना घडली. साहेबराव निकम असे मद्यधुंद कार चालकाचे नाव आहे. 
ही घटना नाशिकमधील मुंबई नाका आणि अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतले.

या घटनेतील एका गंभीर जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या विचित्र अपघातात कार चालक देखील जखमी झाला आहे.  या मद्यधुंद कार चालकावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  कारचालक इतक्या वेगाने कार चालवत होता की  कारचे टायर फाटून कारची देखील दुरावस्था झाली आहे.