हे आहे कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन

कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन होण्याचा मान रत्नागिरीतल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालाय... महिन्याभरातच इथल्या कर्मचा-यांनी परीश्रम घेऊन ही किमया साधलीये.

Updated: Aug 12, 2017, 10:41 PM IST
हे आहे कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन title=

प्रणव पोळेकर, झी मिडिया, रत्नागिरी  : कोकणातलं पहिलं आयएसओ पोलीस स्टेशन होण्याचा मान रत्नागिरीतल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालाय... महिन्याभरातच इथल्या कर्मचा-यांनी परीश्रम घेऊन ही किमया साधलीये.

तक्रार देण्यासाठी येणा-यांना बसण्यासाठी स्वातग कक्ष...महिलांसाठी बांधलेलं विशेष कक्ष...स्वच्छ पोलीस स्टेशनचा परिसर....विविध ठिकाणी लावलेले माहितीचे फलक आणि कार्यकुशलता व सुव्यवस्था या सगळ्याच मुळे कोकण विभागातील हे पहिलंच आएसओ पोलीस स्टेशन झालंय...

पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवायला जाणऱ्या नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे सर्वसाधारण चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते.... मात्र रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो... तक्रार नोंदवायला येणाऱ्या प्रत्येकाला आधी स्वागत कक्षात बसवले जाते, त्याची विचारपूस केली जाते. त्यानंतर ज्या अधिकाऱ्याकडे त्याचे काम असेल त्यांच्याकडे पध्दतशीरपणे पाठवले जाते...आपल्या कार्यक्षेत्रात गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख काम केल्यास, त्या क्षेत्राकडे पाहण्याचा जगाचा दुष्टीकोन बदलतो रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाने आयएसओ मानांकन मिळवत सिद्ध केलंय....

हे सगळं काही एका दिवसात घडलेलं नाहीय..यासाठी पोलीस स्टेशनच्या प्रत्येकांनी अंग मेहनत केलीय...९ जुलै रोजी आयएसओ पोलीस स्टेशन करायच असं पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी ठरवलं आणि अख्ख पोलीस स्टेशन या ठिकाणी कामाला लागलं. सकाळी सात वाजता श्रमदान सुरू व्हायचं ते सकाळी १० वाजेपर्यंत सलग २० दिवसांच्या श्रमदानामुळे ग्रामीण पोलीस स्टेशन आयएसओ झालंय...

आता तर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे रूपच पालटून गेलंय...पूर्वीचं पोलीस स्टेशन आणि आताचं असणारं पोलीस स्टेशन यांमध्ये जमीन, आसमानचा फरक आहे...त्यामुळे रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनप्रमाणेच रत्नागिरीतील इतर पोलीस स्टेशन देखील आता आयएसओ करण्याचा मानस पोलीस अधीक्षकांचा आहे...कधी काळी सुसुत्रता नसणारे पोलीस स्टेशन आणि अस्वच्छेत दिवस काढणारे पोलीस आता मात्र आयएसओमुळे कॉर्पोरेट होताना दिसतायत...