Satara Crime News : साताऱ्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने हा गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. ठार झालेला एकजण मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचे समजते. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे (Satara Crime News ). पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत. या घटनेनंतर साताऱ्यात तणावस्थिती निर्माण झाली आहे.
पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात हा गोळीबाराचा थरार घडला. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी हा गोळीबार केला. या गोळीबारात दोघे जण ठार झाले आहेत. एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मदन कदम हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे. स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला आहे. गोळीबारात ठार झालेला एकजण उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचे समजते.
मुंबईतही हाणामारीची घटना घडली आहे. मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजप कार्यकर्त्याला तुफान मारहाण करण्यात आली आहे. बिभिषण वारे असे मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप वारे यांनी केला आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या भाजप कार्यकर्त्याचं डोकं फोडलं आहे.