EXCLUSIVE : अहमदनगरमध्ये अग्नितांडव! मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे.

Updated: Nov 6, 2021, 02:27 PM IST
EXCLUSIVE : अहमदनगरमध्ये अग्नितांडव! मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत title=

अहमदनगर : अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार असल्याची माहिती झी 24 तासला दिलेली आहे.

या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे."

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात आयसीयू वॉर्डामध्ये ही आग लागली. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तातडीने अधिकाऱ्यांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. 

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा शोक व्यक्त केला असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.