मुंबई : परवानाधारक रिक्षाचालकांना अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये अर्थ सहाय्य देण्याबाबत 19 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे.
ICICI बँकेमार्फत प्रणाली विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे.22 मे पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.
रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळल्यानंतर त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य बँक खात्यात जमा केले जाणार आहे. अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.