नापास होण्याची भीती तिला सतावत होती, तिने थेट नदीत उडी मारली

नदीत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी बुडत असलेल्या तरुणीला पाहिलं आणि...

Updated: May 23, 2022, 03:39 PM IST
नापास होण्याची भीती तिला सतावत होती, तिने थेट नदीत उडी मारली title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : नापास होण्याच्या भीतीने एका तरुणीने तापी नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी तात्काळ आपली बोट तिकडे नेली आणि मुलीचे प्राण वाचवले.

काही मिनिटांचा हा थरारक व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावातील वीस वर्षीय तरुणी पार्वती रवींद्र पाडवी ही एस वाय बी ए चे शिक्षण घेते, तीची परिक्षा तोंडावर आली होती, अभ्यास न झाल्याने आपण नापास होणार ही भिती तिला सतावत होती. 

याच विचारात ती घरून बसमध्ये बसून निझर तालुक्यातील वेलदा टाकी जवळ उतरली, तेथून चालत चालत जुना कुकरमुंडा जवळील तापी नदीच्या पुलावर गेली. 50 ते 60 फूट तापी नदीच्या पुलावरून तिने खोल पाण्यात उडी मारली.  तरुणी बुडत असल्याचे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरड केली. 

नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला वाचण्यासाठी जलद गतीने तीन युवकांनी मुलीच्या दिशेने बोट नेली. मच्छिमारांनी तरुणीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि यात ते यशस्वी ठरले. नदीत बुडत असलेल्या तरुणीला अखेर त्यांनी बोटीवर घेतले. मच्छिमार करणाऱ्या तरुणांनी तीचे प्राण वाचवले. तिला बाहेर काढून तिला रुग्णवाहिकेतून निझर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.