मराठवाड्यात संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक

संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार उठविण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे माहुर तालुक्यातील धानोडा फाटा येथे शिवामृताची गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. 

Updated: Jun 2, 2017, 11:10 AM IST
मराठवाड्यात संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक title=

नांदेड : संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार उठविण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे माहुर तालुक्यातील धानोडा फाटा येथे शिवामृताची गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. 

उस्मानाबाद शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग शेतक-यांनी अडवला. सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावर रास्ता रोको केल्यानं दोन्ही बाजूला दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कर्जमाफी आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.