नागपुरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले

मुंबई : सुट्ट्या आणि घरफोड्या यांचं अतूट नातं आहे... सुट्ट्यांच्या काळात रिकामी घरं फोडली जाण्याचं प्रमाण मोठं आहे... नागपुरात तर सध्या घरफोड्यांच्या घटनात प्रचंड वाढ झालीय. आणि पोलीसांची हतबलता पाहून नागरिक पोलिसांवर संतापलेत. 
नागपूरच्या पांडुरंग गावंडे ले आऊटमधील हे आहेत शरद देशमुख... २५ एप्रिलला नातलगाच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबीय बाहेरगावी गेले. रात्री एक वाजता घरी परतले असता घरफोडी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घरातले दागिने, रोकड असा सव्वादोन 

गेल्या १५ दिवसांत ८ ते ९ घरफोडीच्या घटना झाल्या. सुजाता अनवाने या त्यापैकीच एक त्यांच्याही घरी ६ मेच्या दिवशी चोरी झाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सुट्टीच्या काळात बाहेर फिरायला जावं की नाही असा प्रश्न नागरिकांना पडलाय. चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असूनही पोलिसांची गस्त काही वाढलेली नाही असा नागरिकांचा आरोप आहे. 

पोलिसांना मात्र नागरिकांचा आरोप मान्य नाही... पोलिसांची गस्त सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे. गावंडे ले आऊट हा उच्च मध्यमवर्गीय परिसर. घरात कोणी नसेल तर चोरांचं फावतं. त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. एवढ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या पण पोलिसांनी अजूनही कोणा संशयिताला साधं ताब्यातही घेतलेलं नाही... एकूणच पोलीस नागपूरचे असो नाही तर राज्यातले कोणतेही घरफोड्या हा प्रकार पोलिसांना झेपत नाहीत, उलगडताही येत नाहीत हे स्वतः पोलीसही नाकारणार नाहीत.