अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष्याच्या परीक्षांना 12 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 80 हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. सुमारे 75 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर साडेपाच हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतील अशी माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अगोदर 1 ऑक्टोबर पासून अंतिम वर्षांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते परंतु राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 24 सप्टेंबर पासून संप पुकारला होता या संपावर 1 ऑक्टोंबर रोजी तोडगा निघाला त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नव्याने नियोजन चालवले आहे.
12 ऑक्टोंबर पासून परीक्षा होतील असे जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयीन प्राचार्यांना या परीक्षांच्या अनुषंगाने कळवले जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखा तारखेची उत्सुकता आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची तयारी सुरू आहे.
75 हजार विद्यार्थी देणार ऑनलाईन परीक्षा. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 75 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत अशी परीक्षा नियोजनाची तयारी आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉप या माध्याद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
5500 विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देतील ही परीक्षा विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या महाविद्यालयातून होईल ही बाब परीक्षा विभागाने स्पष्ट केली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वाशीम या पाच जिल्ह्यातून विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.