परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ

काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  विद्यार्थ्यांकडून १०० ते १ हजार रुपये हे तरुण उकळत होते. 

Updated: Feb 23, 2019, 11:42 PM IST
परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी, धक्कादायक व्हिडिओ title=

नांदेड : काही परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि बारुळ येथील शिवाजी महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना नकला पुरवल्या जात असल्याचा हा व्हिडिओ आहे. शुक्रवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात काही तरुण पैसे घेऊन समोरच्या विद्यार्थ्याला नकला देत होते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून १०० ते १ हजार रुपये हे तरुण उकळत होते. 

शिवाजी महाविद्यालयातही अशाचप्रकारे मोठ्या प्रमाणात नकला दिल्या जात असल्याचं निदर्शनास आले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एसएससी बोर्डाचे भरारी पथक आणि पोलीस बंदोबस्त असतांना नकला पुरवण्याचा हा प्रकार कसा काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.