Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam)  सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Updated: Mar 23, 2021, 10:59 AM IST
Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल - मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (10th Exam) आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे (12th exam)  सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (Exam: Announced the revised schedule for the 10th and 12th exams) प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

दहावी- बारावीचं सुधारित वेळापत्रक

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 21 मे ते 10 जून 
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून
40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवणार आहे. सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहा, असे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चं लेखन साहित्य वापरणं बंधनकारक असणार आहे.

विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात 3.00 वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 1 ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात  आले आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. 

तापमान तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याआधी किमान 30 मिनिटं आधी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित असावे, अशा सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा लेखी परीक्षेचा वेळ अर्ध्या तासाने वाढवून देण्यात आला आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कोविड-19चे नियमबंधनकारक असणार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x