मुंबई : मागील पाच तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर सतत घसरत असून तो 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मंदीमुळे रोजगार वाढीचा दर शून्य तर बेरोजगारीचा दर वाढत असून राज्यात नैराश्याचं वातावरण असल्याचेही ते म्हणाले. सहा वर्षातला सगळ्यात निचांकी विकासदर असून हा आकडा तरी खरा आहे का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. सरकारने ही आकडेवारी वेबसाईटवर टाकावी, जर टाकली नाही तर सरकारला काही तरी लपवायचं असल्याचे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.
-आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की, विकासदर अडीच टक्क्यांनी वाढवून सांगितला जातो
- उत्पादन क्षेत्रातील विकासदर 0.6 टक्के इतका खाली आला आहे
- आठ मुलभूत उद्योगांचा ऑगस्टमधील विकासदर 2.1 टक्के होता
- गेल्यावर्षी याच तिमाहीत हा 7.6 टक्के होता
- वाहन निर्मिती उद्योगात आतापर्यंत 2.5 लाख लोकांच्या नोक-या गेल्या आहेत
- वाहन उद्योगातील रोजगार जाण्याचा हा आकडा 10 लाखापर्यंत जाऊ शकतो
- 100 च्या वर शोरूम मुंबई, पुणे, ठाणे परिसरात बंद झाले आहेत
- बेरोजगारीच्या आकड्यांबद्दल संभ्रम निर्माण केला आहे
मुद्रा योजनेत फक्त 20 टक्के लोकांनी आपला रोजगार सुरू केला आहे, हे उद्योग अगदीच लहान आहे, याबाबतचा अहवाल दडवून ठेवण्यात आला आहे, तो उघड करावा अशी मागणी आहे
- सूत गिरणी आणि आसामच्या चहा उद्योगाने वृत्तपत्रात जाहीराती देऊन सरकारचे लक्ष वेधले आहे
- बुस्किट उत्पादनात 35 टक्के घट झाली आहे
- याला जीएसटी जबाबदार आहे
- नोटबंदी आणि जीएसटीमुळे जी मंदी आली आहे ती सावरली जात नाही
- अर्थव्यवस्था वेगाने वाढली नाही, तर सरकारचे उत्पन्न कमी होते आणि वित्तीय घाटा वाढत जातो
- त्यामुळे सरकारचा वेतन आणि इतर खर्च कसा भागणार
- त्यासाठी सरकारने रिझर्व्ह बॅंकेतून पावणे दोन कोटी काढले
- सरकारची मूळ मागणी 3.5 लाख कोटीची होती
- त्यामुळे पुन्हा रिझर्व्ह बॅंकेवर डल्ला मारला जाऊ शकतो
- 71543 कोटी बँकेचे घोटाळे आकडा
- गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा वाढला आहे
- आमच्या काळात नागपूरला मिहानची स्थापना केली मात्र आज 8 मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी परत केल्या
- मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, त्यांनी हे कसे होऊ दिले ?
- महाराष्ट्र सरकारने मिहानमध्ये कोणते उद्योग आले याची माहिती द्यावी