समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!

सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.  

Updated: Dec 9, 2022, 01:09 PM IST
समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन! title=
samrudhhi mahamarg hoarding

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत. सध्या ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते नागपूर मेट्रोची सफर करणार आहेत तसेच समृद्धी महामार्गावरुन प्रवासही करणार आहेत. सध्या या चर्चांमुळे राजकीय नेत्यांमध्येही वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. (Eknath Shinde Devendra Fadnavis Anand Dighe Hoarding on Samruddhi Mahamarg Maharashtra News)

समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी समृद्धी महामार्गावर शेकडोच्या संख्येने होर्डिंग्ज लावले जात आहे. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर समृद्धी महामार्गाच्या दोन्ही लेनच्या मध्ये विजेच्या खांबाचा आधार घेऊन हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत तसेच प्रत्येक होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. समृद्धी महामार्ग शेतकरी, उद्योजक, कामगार, सामान्य नागरिक या सर्वांसाठी कसा फायद्याचा आहे या आशयाचे संदेश आणि माहितीही या होर्डिंगवर आहे मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आनंद दिघे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

samruddhi news

समृद्धी महामार्गाची थोडक्यात ओळख 

नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाला (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway)  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किमी आहे. यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा एक्स्प्रेस वे लोकांसाठी खुला करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उर्वरित मार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. 49,250 कोटी रुपये खर्चून बांधलेला 701 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे 11 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 392 गावांमधून जातो.