रत्नागिरी : एमआयडीसी परिसरात असलेल्या वॅरॉन कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकलेत. वॅरॉन इंडस्ट्रिजचे संचालक श्रीकांत पांडुरंग सावईकर यांनी बनावट पतपत्रांद्वारे बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घातला होता. त्यामुळे फसवणूक, गुन्हेगारीचे कारस्थान आदी आरोप ठेवून बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी 2017 मध्ये संचालकांविरोधात तक्रार दाखल केली होती.
सीबीआयच्या बँकींग सुरक्षा आणि भ्रष्टाचार कक्षाकडे ही तक्रार नोंदवली गेली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच पुणे, सांगली, नागपूरसह सवाईकार यांच्या रत्नागिरीतील मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.