बिअर पिण्याचा 'मग' मोफत न दिल्याने तलावारीचा हल्ला

बिअर पिण्याचा 'मग' मोफत न दिल्याने बिअर शॉपीवर हल्ला करण्याचा प्रकार घडलाय. 

Updated: Aug 24, 2018, 11:57 AM IST
बिअर पिण्याचा 'मग' मोफत न दिल्याने तलावारीचा हल्ला  title=

नागपूर :नागपूरमध्ये बीअर पिण्याचा ''मग' मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर  गुंडांनी तलावरीसह  हल्ला चढवत तोडफोड केलीय. अमरावती मार्गावरील 'र झिरो' बीअर शॉपी समोर गुंडाचा हा हैदोस सीसीटीव्हीत दिसत आहे.या हल्ल्यात एक ' जण जखमी झाला आहे. बुधवारी रात्री  १० च्या सुमारास या बिअर शॉपीत  तीन तरुण आले.  तिथे त्यांचा बीअरवर सुरु असलेल्या स्किमवरून मिळणा-या 'मग' देण्यावारून बिअर शॉपीतील कर्मचा-यांशी वाद  झाला.वादानंतर ते तीन तरुण तिथून निघून गेले. थोड्या वेळात परत  पाच ते सहा जण तलवारीसह आले . बीअर शॉपीवर हल्ला चढवत त्यांनी दगडफेक केली व तोडफोड सुरू केली.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न 

यावरून बिअर शॉपी कर्मचाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमीही झाला.या आऱोपींनी तलवारींसह घातलेला हैदोस आणि तोडफोड सीसीटीव्हीत दिसत आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलीस तपास करीत आहे. नागपूरमध्ये गुंडगिरी वाढत चालल्याचे अशा अनेक घटनांतून याआधीही दिसून आले आहे. यामूळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालायं.