डी.एस.के प्रकरण : 'त्या' अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार

सुशील मुहनोत यांच्याबाबत पोलिसांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Updated: Oct 19, 2018, 06:26 PM IST
डी.एस.के प्रकरण : 'त्या' अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार  title=

पुणे : डी एस कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज देऊन गुंतवणूकदारांचं नुकसान केल्याप्रकरणी जून महिन्यात अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यायचं पुणे पोलिसांनी ठरवलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिस उद्या पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

क्लोजर रिपोर्ट सादर 

बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे, बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता आणि झोनल मॅनेजर नित्यानंद देशपांडे या तिघांविरोधातील गुन्हे मागे घेऊन त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांच्याबाबत पोलिसांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.