Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे.
ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पोहोचला.
धुळ्यानंतर छत्रपती संभाजीनंतर त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये जाऊन तीन दिवस राहिला.
मुंबई पोलिसांची एकूण पाच पथक त्याच्या मागावर होती.
गुजरातमधून ललित पाटील समृद्धी महामार्ग पकडून सोलापुरात आला आणि त्यानंतर त्याने कर्नाटकात प्रवेश केला.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अखेर ललित पाटीलला अटक करण्यात आलीय.
ललित पाटील बेंगलूरूमधून परदेशात पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली.
ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या लोकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले होते.