दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल

पावसाअभावी शेतं ओसाड

Updated: Oct 22, 2018, 05:27 PM IST
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल title=

औरंगाबाद : पावसाअभावी शेतं ओसाड पडलीय आहेत. पिण्याला पाणी नाही. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार 31 ऑक्टोबरची वाट पाहतंय. राज्यात दुष्काळाची दाहकता किती आहे याची कल्पना सरकारला आहे. मात्र असं असतानाही दुष्काळाची घोषणा करण्यासाठी एवढा विलंब का केला जातोय असा प्रश्न आहे. 

दुष्काळ अजून जाहीर झालेला नाही. शेतकरी मात्र अक्षरशः होरपळतोय. जनावरांच्या चारा पाण्यासाठी शेतकरी हवालदिल झालाय. ऑक्टोबर महिन्यातच चारा विकत घेण्याची वेळ आलीय. आठवड्याला तीन हजारांचा चारा लागत आहे. म्हणजे महिन्याभरात १२ हजार रूपये निव्वळ चाऱ्यावर खर्च होत आहेत. शेतकरी यामुळे कसा तगणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.