रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह  जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Nov 25, 2023, 10:05 PM IST
रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी  title=

ratnagiri konkan : रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभणीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. 

महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’तर्फे रत्नागिरी जिल्ह्यात 11 ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 47 मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालण्यास मनाई करण्यात आलेय. जिल्ह्यातील 20 मंदिरांच्या दर्शनी भागात तसे फलक लावण्यात आले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील या मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू

१. श्री नवलाई, पावणाई, जाकादेवी, महापुरुष देवस्थान मंदिर, नाचणे, ता. रत्नागिरी
२. श्री साई मंदिर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. रत्नागिरी
३. श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
४. श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
५. श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्ला, रत्नागिरी
६. श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, रत्नागिरी
७. श्री दत्त मंदिर खालची आळी, रत्नागिरी
८. श्री मारुती मंदिर संस्था ( दक्षिणाभिमुख मारुती मंदिर), मारुती मंदिर, रत्नागिरी
९‹. श्री साई मंदिर, मोडेवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
१०. श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर, वरचीवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी 
११. श्री लक्ष्मीकांत मंदिर, लक्ष्मीकांत वाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
१२. श्रीराम मंदिर, पावस, ता. रत्नागिरी
१३. श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, रत्नागिरी
१४. श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, राजापूर 
१५.श्री निनादेवी मंदिर, राजापूर,
१६. श्री कामादेवी मंदिर, राजापूर
१७. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गुजराळी, राजापूर 
१८. श्री चव्हाटा मंदिर, जवाहर चौक, राजापूर
१९.श्री महाकाली मंदिर, आडिवरे, ता. राजापूर
२०. श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२१. श्री सत्येश्वर मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२२. श्री जाकादेवी मंदिर, कशेळी, ता. राजापूर
२३. श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर
२४.  श्री गणेश मंदिर, मावळत वाडी, कालुस्ते, ता. चिपळूण 
२५. श्री हनुमान मंदिर, कुंभार वाडी, भिले, ता. चिपळूण
२६. श्री देव सिध्देश्वर मंदिर (सिध्देश्वर प्रतिष्ठान), भिले, ता. चिपळूण
२७. श्री देव महादेव भानोबा कालेश्री देवस्थान भिले -धामेली ट्रस्ट, भिले-धामेली, ता. चिपळूण
२८. श्री लक्ष्मीकांत देवस्थान, गांग्रई, ता. चिपळूण
२९. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गांग्रई, ता. चिपळूण
३०. श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, गांग्रई, ता. चिपळूण
३१. श्री खेम वाघजाई मंदिर, ग्रामदैवत, बिवली-करंबवणे, ता. चिपळूण
३२. श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी, मालदोली, ता. चिपळूण
३३. श्री देव जुना कालभैरव मंदिर, चिपळूण
३४. श्री विंध्यवासीनि मंदिर, रावतळे, चिपळूण
३५. श्री शिव मंदिर, चिपळूण
३६. श्री काळेश्री मंदिर, कान्हे, ता. चिपळूण
३७. श्री हनुमान मंदिर, पिंपळी, ता. चिपळूण
३८. श्री हनुमान मंदिर, पेढांबे, ता. चिपळूण
३९. श्री गणेश मंदिर, नांदिवसे, ता. चिपळूण
४०. श्री रामवरदायिनी मंदिर,दादर, ता. चिपळूण
४१. श्री मुरलीधर मंदिर, चिपळूण
४२. श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे दादर(दसपटी ), ता. चिपळूण   
४३.श्री चंडिका माता मंदिर, गणपतीपुळे, ता. रत्नागिरी
४४. श्री सोमेश्वर सुंकाई एन्डोमेंट ट्रस्ट, सडये, पिरंदवणे, ता. रत्नागिरी                    
४५. श्री परशुराम मंदिर, परटवणे, रत्नागिरी                     
४६. स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांचीवाडी, रत्नागिरी
४७. श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड, ता. दापोली
४८. श्री भार्गवराम देवस्थान, कोळबांद्रे, ता. दापोली
४९. श्री विमलेश्वर मंदिर, मुर्डी, ता. दापोली
५०. कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले, ता. दापोली
५१ गणपती पंचायतन मंदिर केळेय रत्नागिरी