बुलडाणा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून संपूर्ण राज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत. राज्यातील सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहेत. त्यांची अमलबजावणी करण्यात सुरुवातही झाली आहे.
हॉटेल व्यावसायिक, मॉल व इतर ठिकाणच्या रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छता पाळली जाते किंवा नाही तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नसावा यासाठी नियमित आरोग्य तपासणी होते किंवा नाही याबाबतचा अहवाल वेळोवेळी घेण्यात यावा ! #FDA #Maharashtra #FDAMumbai @OfficeofUT pic.twitter.com/hgm8jL9EUr
— Dr.Rajendra Shingne (@DrShingnespeaks) January 21, 2020
या मोहिमेची सुरूवात सोमवारपासून बुलडाणा शहरातून करण्यात आली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल सोमवारी शहरातील चिंचोले चौकात हातगाडीवर पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चायनीज, आईस्क्रीम अन्नपदार्थ व्रिकेत्यांना हॅन्डग्लोज आणि कॅपचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची, नखांची स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करत त्यांचे परवानेही तपासले.
दरम्यान, हॉटेल व्यावसायिक, मॉल आणि इतर ठिकाणच्या रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छता पाळली जाते किंवा नाही तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नसावा यासाठी नियमित आरोग्य तपासणी होते किंवा नाही याबाबतचा अहवाल वेळोवेळी घेण्यात यावा, असे सक्त आदेश याआधीच मंत्र्यांनी दिले होते.
0