राज ठाकरे यांचा भाजपकडूनच राजकीय गेम.. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं हे कारण

मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.

Updated: May 11, 2022, 05:09 PM IST
राज ठाकरे यांचा भाजपकडूनच राजकीय गेम.. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं हे कारण title=

कोल्हापूर : भाजपमधील नेते विनोद तावडे (VInod Tawde), पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांचा विश्वास ज्या नेत्यांनी गमावला त्यांच्यावरच आता राज्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे. जे राज्यातील नेत्यांचा विश्वास संपादन करू शकलेले नाही ते इतरांचा विश्वास काय संपादन करणार? अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे ( Dr. Neelam Gorhe ) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendr Fadnavis ) यांच्यावर केलीय.

कोल्हापूर दौऱ्यावर आल्या असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री यांना निवडून देत जनतेने विरोधकांना धडा शिकवला. जे कोल्हापुरात घडले तेच सगळ्या ठिकाणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत आहेत. केवळ विरोधाला विरोध म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांच्या या उपद्रवी वृत्तीला १४ मे रोजी होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात चोख उत्तर मिळेल, असे त्या म्हणाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांची धडपड आपला पक्ष वाचविण्यासाठी आहे. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. झेंडा बदलला, सीमाप्रश्नी वेगळी भूमिका घेतली, मराठीचा मुद्दा घेतला. आता हिंदुत्व हाती घेतले आहे. पण, भाजपला त्यांनी पुरते ओळखलेले नाही. त्यांचा कधी राजकीय गेम होईल हे त्यांनाही कळणार नाही. त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष दिसणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.