दुसऱ्या दिवशी गृहप्रवेश, आदल्या दिवशी डोंबिवली स्फोटात मृत्यू... 24 वर्षांच्या रोहिणीचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीतल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला. तर 64 जण जखमी झाले, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहिणी कदम या 24 वर्षांच्या तरुणीचाही या स्फोटात मृत्यू झाला. दु:खद म्हणजे दुसऱ्याच दिवशी तिच्या नव्या घराचा गृहप्रवेश होता.  

चंद्रशेखर भुयार | Updated: May 25, 2024, 03:39 PM IST
दुसऱ्या दिवशी गृहप्रवेश, आदल्या दिवशी डोंबिवली स्फोटात मृत्यू... 24 वर्षांच्या रोहिणीचं स्वप्न अपूर्णच राहिलं title=

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीतल्या अमुदान या केमिकल कंपनीत (Amudan Chemical Company) रिअॅक्टरच्या स्फोटात (Blast) 13 लोकांचा मृत्यू झाला. तर 64 हून अधिक जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला अटक करून कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्याला 29 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आधी ठाणे गुन्हे शाखेने त्याला घाटकोपर इथून ताब्यात घेतलं होतं.

25 वर्षांच्या तरुणीचा दुर्देवी मृत्यू
डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात निष्पाप जीवांचा बळी गेला. 25 वर्षांची रोहिणी कदम (Rohini Kadam) ही यापैकीच एक.  मूळची रायगड जिल्ह्यातील कोलमांडला इथल्या रोहिणी कदम या तरुणीचा डोंबिवली स्फोटात (Dombivli MIDC Blast ) दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिणी ग्रॅज्युएट होती आणि एमआयडीसीतल्या एका कंपनीत ती जॉब करत होती. स्फोटाच्या दिवशी ती कंपनीतच होती. स्फोटात मृतदेह संपूर्ण जलाळेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती. रोहिणीच्या कपड्यांवरुन आणि दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरुन तिच्या चुलत भावाने मृतदेह रोहणीचाच असल्याचं सांगितलं. 

ब्लास्टमध्ये हरवलं तीच गृहप्रवेशाचं स्वप्न
इतर मुलीप्रमाणे रोहिणीनेही अनेक स्वप्न पाहिली होती. आपलं हक्काचं घर असावं असं तिचं स्वप्न होतं. कष्ट आणि मेनहनीच्या जोरावर तीने हे स्वप्न प्रत्यक्षातही उतरवलं होतं. डोंबिवलीतल्या आजदेमध्ये तीनं नवं घर घेतलं होतं, आणि त्या घरात ती शुक्रावरी ती गृहप्रवेश करणार होती. पण त्यााधीच म्हणजे गुरुवारी रोहिणीचं गृहप्रवेशाचं स्वप्न आगीत जळून खाक झालं. घटनेच्या दिवशी रोहिणी खूप खुश होती कारण गुरुवारी रोहिणीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता 

स्फोटानंतर नातेवाईकांकडून शोधाशोध
ज्या अमुदान कंपनीत स्फोट झाला, त्याच्या बाजूच्या कंपनीत रोहिणी काम करत होती. स्फोटाची माहिती रोहिणीच्या नातेवाईकांना समजली आणि एकच धावाधाव झाली. नातेवाईकांनी रोहिणीच्या शोधासाठी घटनास्थळी आणि रुग्णायलात धाव घेतली. अखेर शास्त्रीनगर रुग्णालयात एका महिलेचा जळालेला मृतदेह त्यांच्यासमोर आण्यात आलं. मृतदेह संपू्र्ण जळालेला असल्याने ओळख पटवणं अवघड होतं. पण मृतदेहावरचा ड्रेस आणि दाला बसवण्यात आलेल्या तारेवरुन हा मृतदेह रोहिणीचाच असल्याचं तिच्या चुलत भावाने ओळखलं. 

त्यानंतर खात्री करण्यासाठी रोहिणीच्या सख्या भावालाही हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. रोहिणीचा मृतदेह पाहून भावाला धक्का बसला. अवघ्या 24 वर्षांच्या तरुण मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.