डोंबिवली: जगात लोकप्रिय ठरलेली मनी हाईस्ट (Money Heist) ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज (Web series) पाहून एका बॅंकच्या (BANK) कॅश मॅनेजरने आपल्याच बॅंकेच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. डोंबिवलीमधील (Dombivali) एमआयडीसी भागात असलेल्या आयसीआयसीआय (ICICI Bank) या बॅंकेच्या तिजोरीतून 12 कोटी रुपये चोरी केल्याचे समोर आले आहे.
त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीत असलेल्या डल्ला मारण्याचा कट वर्षभरापूर्वी रचला होता. या बँकेच्या दरोड्यासाठी वेब सिरीज पाहत होता. काही बेव सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची कल्पना आली. मात्र आता या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Dombivali Crime News)
डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC) निवासी भागात आयसीआयसीआय (ICICI Bank) बॅक आहे. या बँकेत आरोपी अल्ताफ शेख (वय 43 ) हा कॅश मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीत असलेल्या डल्ला मारण्याचा कट वर्षभरापूर्वी रचला. या बँकेच्या दरोड्यासाठी वेब सिरीज पाहत होता. काही बेव सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची कल्पना आली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेच्या विषयी सर्वच माहिती होती.
त्याने एके दिवशी बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम करताना पहिले आणि त्या दिवसापासून तो एसीच्या डक्टमधून कसे बँकेच्या तिजोरीत जाता येईल याची योजना आखली, आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला आणि चोरीची योजना आखण्यासाठी चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केली.
त्यानंतर 9 जुलैला सुट्टीचा दिवस त्याने चोरीसाठी निवडलेल्या, त्याने अलार्म निष्क्रिय केला. सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून टाकल्या आणि तिजोरीतून 12 कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधून बनवलेल्या छोट्या छिद्रातून ही रोकड बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कचरापेटीनजीक ताडपत्रीने झाकून ठेवली होती.
वाचा : Repo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
आत्तापर्यंत पाच जणांना अटक: चोरीतील मुख्य आरोपी अल्ताफ शेख (43) याच्या कडून पोलिसांनी सुमारे 9 कोटी रुपये जप्त केले आहेत. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शेखला अटक करण्यात आली. सोमवारी शेखच्या अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याची बहीण नीलोफरसह पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी नीलोफर आणि अबरार कुरेशी (33), अहमद खान (33) आणि अनुज गिरी (30) या तिघांना अटक केली होती. ही चोरी 12 जुलै रोजी झाली होती.
चोर बॅंकेतच होता कामाला: मुंब्य्रातील रहिवासी असलेला शेख हा आयसीआयसीआय बँकेतच कस्टोडियन म्हणून काम करत होता. कस्टोडियन म्हणून तो बँकेच्या लॉकरच्या चाव्या सांभाळात असायचा. चोरीचे नियोजन करण्यात, यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास करण्यात आणि साधने गोळा करण्यात त्याने वर्ष घालवले, असे मानपाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.