'बाबा यात आमची काय चूक...' डोंबिवलीतली आगीची 'ती' घटना ठरवून, आईसह दोन मुलींचा होरपळून मृत्यू

मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींचा अखेर मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना  

Updated: Oct 4, 2022, 01:54 PM IST
'बाबा यात आमची काय चूक...'  डोंबिवलीतली आगीची 'ती' घटना ठरवून, आईसह दोन मुलींचा होरपळून मृत्यू title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण :   डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात एका घराला आग लागून त्यामध्ये एका महिलेसह दोन मुली आणि एक पुरुष होरपळल्याची घटना घडली होती. यात त्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. प्रसाद पाटील हा पत्नी प्रिती आणि समीरा आणि समीक्षा यो दोन मुलींसह भोपर गावात रहात होता.  शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. या आगीत प्रसाद पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रिती, मुलगी समीरा आणि समीक्षा या होरपळल्या होत्या. 

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चौघांवरही रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी प्रीती समीर व समीक्षा यांची प्रकृती चिंताजनक होती. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्रीती यांचा मृत्यू झाला. तर मृत्यूशी झुंज देणाऱ्या 13 वर्षांच्या समीक्षा आणि 11 वर्षांच्या समीराचादेखील आज मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

याप्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरु केला. तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. कौटुंबिक वाातून प्रसाद पाटील यानेच पत्नी प्रीती आणि दोन मुलींना जीवे ठार मारलं असल्याचं उघडकीस आलं. प्रसाद आणि प्रीतीमध्ये वाद सुरु होते. याआधी चार वर्षांपूर्वी प्रसादने प्रीतीला मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रीती त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. 

पण शनिवारी त्याने डाव साधलाच. संधी साधत त्याने घराला आग लावली. शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणाने घराला आग लागल्याचं सुरुवातील सर्वांना वाटलं, पण त्यानंतर पोलीस तपासात प्रसादनेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. याप्रकरणी प्रसादविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाददेखील जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.