पुण्यात गणेशोत्सव काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच...

डॉल्बी आणि डीजेच्या वापराला परवानगी नाही.

Updated: Aug 23, 2019, 07:20 PM IST
पुण्यात गणेशोत्सव काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच... title=

पुणे : गणेशोत्सव काळात डॉल्बी आणि डीजेच्या वापराला परवानगी देता येणार नाही, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आज त्यांनी असमर्थता दर्शवत न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध घालण्यात आल्यामुळे पोलिसांनी घालून दिलेली मर्यादा पाळावीच लागेल, असं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालायनं यंदाही गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ड़ीजे आणि डॉल्बी वाजवण्यावरची बंदी कायम ठेवलीय. ड़ीजे, डॉल्बीच्या मालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अतिम सुनावणी चार आठवड्यानंतर करण्यात येणार आहे. तोपर्यंत सरकारनं घातलेली बंदीही कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर बंदी कायम राहणार आहे. 

महाराष्ट्रात गणेशोत्सव काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठे मोठे डीजे वाजवले जातात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. पोलीस दरवर्षी या संदर्भात नोटीस देखील पाठवात आणि कायद्याचं पालन करणाऱ्या डीजे आणि डॉल्बीवर जमा देखील केले जातात.

याआधी साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडीयो अँड लाइटिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती.