अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलांना चावा

शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून पालिका मात्र यावर काहीही उपयोजना करत नाही. त्यामुळे लहान मुलांना कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Updated: Oct 18, 2017, 01:37 PM IST
अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलांना चावा title=

अंबरनाथ : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून पालिका मात्र यावर काहीही उपयोजना करत नाही. त्यामुळे लहान मुलांना कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

अंबरनाथच्या रॉयल पार्क भागात मांसाची अनेक अनधिकृत दुकानं थाटण्यात आली असून यामुळं कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढलीये. ही कुत्री परिसरात खेळणा-या लहान मुलांना लक्ष्य करत असून मागील काही महिन्यांत अशा चार ते पाच घटना घडल्या आहेत. 

मंगळवारी संध्याकाळी अशाच प्रकारे इमारतीखाली खेळणा-या बिपीन बालन या दुसरीत शिकणाऱ्या लहानग्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्याच्या उजव्या पायाचा कुत्र्याने अक्षरशः लचका तोडला. या प्रकारानंतर स्थानिकांमध्ये सुस्त पालिका प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण आहे.