धुळे : बिबट्याच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना सटाणा तालुक्यातील तळवाड़े -भामेरच्या गोमदंडा शिवारात घडली. पुजा गुलाब नामदास असं जखमी मुलीचं नाव आहे. गोमदंडा शिवारात या मेंढपाळ कुटुंबासह मेंढ्यांचा मुक्काम होता. पुजा रात्री आपल्या आई आणि काकुंसोबत झोपली होती. बिबट्याने रात्रीच पुजावर हल्ला चढविला . वाड्यावरील कुत्रे बिबट्यावर भुंकु लागल्याने सर्व जण जागे झाले. आरडा ओरड केल्याने बिबट्याने मुलीला तिथेच टाकून पळ काढला मात्र या हल्ल्यात पुजा गंभीर जखमी झाले असून तिच्यावर धुळे इथल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत .