पोलीस कर्मचा-यानं काढली अल्पवयीन मुलीची छेड, गावात तणाव

धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस स्थानकात नासीर पठाण या पोलीस कर्मचा-यानं एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. 

Updated: Feb 5, 2018, 07:15 PM IST
पोलीस कर्मचा-यानं काढली अल्पवयीन मुलीची छेड, गावात तणाव title=

धुळे : धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस स्थानकात नासीर पठाण या पोलीस कर्मचा-यानं एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची माहीती मिळताच ग्रामस्थांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून गेला. संतप्त जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक सूरू केली. संबधीत पोलीस कर्मचा-याला ताब्यात द्या अथवा तात्काळ निलंबीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. 

कर्मचा-यावर गुन्हा दाखल

घटनेचं गांभीर्य ओळखत पोलीस उप-अधिक्षक संदीप गावीत थाळनेर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करत जमावाला शांत केलं. ज्या मुलीची छेड काढण्यात आली होती. ती गतिमंद असल्याची माहिती समोर येतेय. ग्रामस्थांनी कर्मचा-यालाही चांगलाच चोप दिला.