SSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर

SSC Exam 2023: एकीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले जात असताना बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या चुका आढळून येत आहे. याआधी बारावीचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच चुकीचा देण्यात आला आहे

Updated: Mar 6, 2023, 07:11 PM IST
SSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर title=

MaharashtraSSC Exam 2023 : राज्यात सध्या माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अभ्यास करुन या परीक्षांना सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे पूर्ण तयारी करुनही शिक्षण मंडळ वारंवार परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. एकीकडे बारावीचे पेपर फुटत आहेत. तर दुसरीकडे पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून येत आहेत. मात्र धाराशिवमध्ये (Dharashiv) घडलेल्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. धाराशिवच्या एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर लिहायला लावल आहे.

धाराशिव शहरातील शरद पवार माध्यमिक हायस्कूल या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चुकीचा दहावीचा पेपर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांना हा पेपर लिहायला लावला आहे. पेपर सुरु झाल्यानंतर मराठी माध्यमांच्या मुलांना सीबीएससी पॅटर्नचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला होता. हा पेपर पाहून विद्यार्थ्यांना नेमकं काय घडलंय हे समजून आले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना हा सर्व प्रकार सांगितला आणि चुकीचा पेपर दिल्याचे सांगितले.

मात्र त्यानंतरही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बळजबरीने पेपर लिहायला लावला. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला. यानंतर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रावरच तळ ठोकला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दुसरीकडे दहावीचा आज इंग्रजीचा पेपर होता मात्र मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्नचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला.

दरम्यान, हा सर्व प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी गजानन सुसर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शिक्षण अधिकाऱ्यांनी संतापलेल्या पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. यावेळी चुकीचा पेपर वाटणाऱ्या गार्डिंग वरील शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच दहावीचा इंग्रजीचा पेपर परत घेण्याची विद्यार्थ्यांची शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.