साईबाबांच्या चरणी सोन्याचं फुलपात्र

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्त अनेकवेळा न मोजता दान ठेवत असतात.

Updated: Jan 21, 2019, 07:15 PM IST
साईबाबांच्या चरणी सोन्याचं फुलपात्र title=

शिर्डी - शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्त अनेकवेळा न मोजता दान ठेवत असतात. त्यामुळे याच्या बातम्या नेहमीच चर्चेत येतात. सोमवारी अशीच एक घटना चर्चेत आली. साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या फुलपात्राचे वजन १९५ ग्रॅम इतके आहे. 

आंध्र प्रदेशमधील सिंकदराबाद येथील रामेश्वरराव नारायण शर्मा असे या भक्ताचे नाव आहे. त्यांनी १९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुलपात्र साईबाबांच्या चरणी दान केले आहे. या फुलपात्राची बाजारातील किंमत सहा लाख ९० हजार रुपये इतकी आहे. सोमवारी माध्यान्ह आरतीवेळी साईबाबांना नैवेद्य दाखवताना याच फुलपात्रातून पाणी देण्यात आले होते. आता रोज नैवेद्य दाखवताना याच सोन्याच्या फुलपात्रातून साईबाबांना पाणी देण्यात येणार असल्याचे साईबाबा संस्थानने स्पष्ट केले आहे. 

याआधीही अनेक भक्तांनी साईबाबांच्या चरणी लाखो रुपयांचे दान दिले होते. काहींनी सोन्या-चांदीचे दागिनेही दान म्हणून दिले होते.

Tags: