Deepali Sayyad : मोठी राजकीय उलथापालथ ! शिंदे गट देणार ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नावाची जोरदार चर्चा

Maharastra Politics:  आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.

Updated: Oct 30, 2022, 08:10 AM IST

Deepali_Sayyad_will_join_BJP

Deepali Sayyad On The Way To BJP : महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील चित्र बदललं आणि शिवसेना (Shiv Sena) दुभागली गेली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप उद्धव ठाकरेंना प्रत्येक वेळी धक्का देण्याचा तयारीत असतात. आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. (Dipali Syed will join BJP today maharastra politics nmp )

रांगोळीतून दिले होते संकेत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या सेलिब्रिटी चेहरा'दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचं नाव चर्चेत आहे. दिवाळीनिमित्त दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियावर संकेत दिले होते. दिपाली सय्यद यांनी दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दारासमोर त्यांनी कमळाची रांगोळी (Deepali Sayyad rangoli) काढली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे आज दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करतील असं तर्क लावण्यात येतं आहे. 

हे कारण असल्याची शक्यता

सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद ह्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद यांनी सुचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये जाणार?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

पण, नक्की कोण पक्ष प्रवेश करणार आहे याची स्पष्टता झालेली नाही...पण, आज शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत...