राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढावा म्हणून सरकारने नेमला अभ्यास गट

राज्यातील बिअर विक्रीत घट झाल्याने शासनाने  समिती नेमली आहे. तसेच उत्पादन शुल्क कमी करण्याची देखील मागणी केली जात आहे. 

Updated: Oct 19, 2023, 11:07 PM IST
राज्यातील बिअर विक्रीत घट; खप वाढावा म्हणून सरकारने नेमला अभ्यास गट title=

Maharashtra Excise Department : राज्यातील बिअर विक्रीत घट झाली आहे. यामुळे शासनाने विशेष समिती नेमली  आहे. बिअरचा खप वाढावा म्हणून  राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजब निर्णय घेतला आहे. राज्यातील बिअर विक्रीत घट झाल्याने आता सरकाराने यात लक्ष घालत खप वाढवण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे. 

बिअरचा खप वाढावा म्हणून उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हालचाली सुरु केल्याचे दिसत आहे. राज्यात बिअरचा खप कमी झाल्याने महसुलात घट झाली आहे. 

महसूल वाढीसाठी शासनाने नेमला अभ्यासगट

बिअर विक्रीत घट झाल्याने महसुल खात्याचे मोठे नुकसान होत आहे.  महसूल वाढीसाठी शासनाने अभ्यासगट नेमला आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट बनवला आहे.  अभ्यासगटात पाच सदस्यांचा समावेश आहे.  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, उप सचिव आणि अपर आयुक्तांचा समावेश आहे.  इतर राज्यातील बिअरचा धोरणांचा अभ्याल करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

सोलापूरमध्ये 6 लाखाची हातभट्टी दारू जप्त

सोलापूरमध्ये 6 लाखाची हातभट्टी दारू जप्त केलीये. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहाटेच्या सुमारास विविध ठिकाणच्या हातभट्ट्यांवर छापे टाकले. या छाप्यामध्ये 3 हजार लिटर दारू आणि 22 हजार लिटर रसायन जप्त केले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 5 अवैध दारू विक्रेत्यांना अटक 

भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभाग आणि भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागानं 5 अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 79 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पहिली कारवाई  राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा यांनी आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरु असलेल्या अवैध विदेशी बनावट दारू कारखान्यावर धाड़ी टाकत 5 आरोपींना अटक केली.  नकली दारू बनविन्यासाठी लागणारे साहित्य आणि वाहन पकड़ून 3 लाख 29 हजार 720 रूपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला.