अंबरनाथ येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दारू पिऊन आलेल्या तरूणांची अचानक तब्येत बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर रुग्णायालयात उपचार सुरू आहेत. 

Updated: Dec 26, 2017, 03:56 PM IST
अंबरनाथ येथील तरुणाचा  उपचारादरम्यान मृत्यू  title=

अंबरनाथ : दारू पिऊन आलेल्या तरूणांची अचानक तब्येत बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर रुग्णायालयात उपचार सुरू आहेत. 

गणेश जाधव आणि आशिष जाधव हे अंबरनाथमधील सूर्योदय नगर परिसरात दारू पिऊन घरी गेले. मात्र सकाळी आशिष याला उलट्या होऊ लागल्याने त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर गणेशवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आशिषचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.