टॉयलेटमध्ये नेले आणि... 5 वर्षाच्या मुलावर डान्स टीचरचा लैंगिक अत्याचार; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याण मधील एका नामांकित शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका डान्स टीचरने पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Aug 21, 2023, 09:22 PM IST
टॉयलेटमध्ये नेले आणि... 5 वर्षाच्या मुलावर डान्स टीचरचा लैंगिक अत्याचार; कल्याणमधील धक्कादायक प्रकार title=

Kalyan Crime News : एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय तरुणाने12 वर्षीय अल्वयीन मुलीची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 5 वर्षाच्या मुलावर डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केला आहे. कल्याणमधील नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पालक संतप्त झाले आहेत.

कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिक्षक म्हूणन कामं करत असलेल्या शिक्षकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डान्स टीचर समीर कदम याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

पीडित पाच वर्षीय मुलगा हा शाळेत असताना शौचालत गेला असतानां त्याला डान्स टीचर समीरने पकडून लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा पळून गेला.  घरी आल्यावर त्याने आई वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आहे. पीडित मुलाच्या पालकांनी पोलिस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

साखरपुड्यासाठी मेकअप करायला आल्या आणि दागिने, पैसे घेवून पसार झाल्या

डोंबिवलीत एका साखरपुड्यासाठी मेकअप करण्यासाठी आलेल्या दोन महिल आर्टिस्ट चोरी करून पसार झाल्या होत्या. या महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या नंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी  सीसीटीव्हीच्या मदतीने कल्पना राठोड आणि अंकिता परब याना अटक केली. पूजा गुप्ता यांचा मेकअप करण्यासाठी कल्पना राठोड आणि अंकिता परब या डोंबिवलीच्या घराडा सर्कल परिसरातील हॉलमध्ये आल्या होत्या. मेकअप करून झाल्यानंतर पूजा यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कानातील सोन्याचे रिंग आणि काही रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी डोंबिवली पोलिसात या संदर्भात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बँक्वेट हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. शिवाय त्यांच्याकडून चोरीला गेलेला माल जप्त केला आहे.