मुंबई / सोलापूर : Rains in Maharashtra in next 4-5 days :राज्यात अवकाळीचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यात अवकाळी मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील 4 ते 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट अधिक आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तरेकडून उष्ण हवा राज्यातून महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. राज्यातील हवामान कोरडे आहे.
दरम्यान, सांगोला तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. दंडाची वाडी येथील शेतकरी आनंद गोडसे या शेतकऱ्याच्या दोन एकरावरच दोडका पिक भुईसपाट होऊन नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्षबागानाही वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.