अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. 

Updated: Jun 19, 2021, 07:00 PM IST
अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का... title=
अजित पवार असे गर्दीत दिसत आहेत.

पुणे : राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी ही मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, अजित पवार यांनी यापुढे कोणी गर्दी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. मात्र, त्यांचा हा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नाही का, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधकांनी आघाडी सरकावर जोरदार टीका केली आहे. महत्वाचे नेते असे वागत असेल तर कोरोनाचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

..हे योग्य नाही, असे म्हणत अजितदादांचा अखेरचा इशारा

दरम्यान, पुण्यातील दुकाने शनिवार, रविवार बंदच राहणार आहेत. पुण्यात विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळला जाणार आहे. विकेंडला नागरिक पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. राज्याबाहेर प्रवास करत आहेत, महाबळेश्वर, लोणावळ्यात गर्दी करत आहेत. हे चुकीचे आहे, असे अजित पवार म्हणाले. ट्रेकिंगसाठी भटकणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल असा अखेरचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी आता गांभीर्याने वागावे, असं अजित पवार यांनी म्हटले होते.

अजितदादा, गर्दीत हरवतात तेव्हा...

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन करत आहेत. मात्र, त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

त्याआधी नो मास्क, नो उमेदवारी नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गांर्भीयाने घेताना दिसून येत नाही, हे पुण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमात दिसून आले आहे.