पिकविम्याची वेबसाईट कमकुवत, कसा होणार डिजिटल इंडिया?

पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठीची वाढीव मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली आहे. 

Updated: Aug 5, 2017, 06:50 PM IST
 title=

धुळे : पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठीची वाढीव मुदत संध्याकाळी पाच वाजता संपली आहे. दरम्यान सरकारने पीक विम्याबाबत शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचं चित्र धुळ्यात पाहायला मिळालं. शहरातील भगवा चौक इथे शेतकरी सकाळपासून पीक विमा काढण्यासाठी रांगेत उभे होते. 

मात्र महा ई सेवा केंद्रात सर्वर डाउन असल्यानं शेतक-यांची इच्छा असूनही वीमा काढता आला नाही. मध्यरात्री बारा वाजेपर्यत पीकविम्याचा ऑनलाईन अर्ज भरलाच जात नव्हता. लिंक ओपन होत नसल्याने शेतकरी तब्बल चौदा तास महा ई सेवा केंद्रावर ताटकळत उभे होते.