Sangali : सांगलीत 10 मगरींचा धुमाकूळ, गावांमध्ये दहशत

हे दृश्य कुठल्या प्राणीसंग्रहालयातलं नाही. तर ही आहे कृष्णा नदी. सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या याच कृष्णामाईच्या पात्रात मगरींची दहशत माजलीय.  

Updated: Aug 5, 2022, 12:02 AM IST
Sangali : सांगलीत 10 मगरींचा धुमाकूळ, गावांमध्ये दहशत   title=

रवींद्र कांबळे, झी 24 तास, सांगली :  सांगलीत कृष्णा नदी (Sanagli Krushna River) पात्रात मगरींचा अक्षरश: धुमाकूळ पाहायला मिळतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील रहिवशांमध्ये भीती पसरलीय. इथं आतापर्यंत 10 मगरी आढळून आल्या आहेत. (crocodile terror in sangli  panic in krishna riverside village)

हे दृश्य कुठल्या प्राणीसंग्रहालयातलं नाही. तर ही आहे कृष्णा नदी. सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या याच कृष्णामाईच्या पात्रात मगरींची दहशत माजलीय. या नदीत मगरींचं भयानक वास्तव्य पाहायला मिळतंय. कृष्णेच्या पात्रात आतापर्यंत तब्बल 10 मगरी आढळून आल्यायेत. औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी दरम्यान या मगरी आढळून आल्यानं इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. 

खरं तर दरवर्षी ऑगस्टमध्ये कृष्णेच्या पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे पाण्यातील मगरी बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात. मात्र यंदा पाणी स्थिर असल्यानं मगरींच्या स्थलांतराला ब्रेक लागलाय. याशिवाय कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे नदीत खिलापीया माशांची प्रजाती वाढलीय. या माशांवर नियंत्रण ठेवण्याचं काम या मगरी करतात. 

सध्या कृष्णा नदीत या मगरी सर्रासपणे दिसून येतायेत. सुदैवानं या मगरींनी कुणावर हल्ला केल्याचं ऐकिवात नाही. मात्र मगरींचं हे आक्राळविक्राळ रूप पाहून इथल्या रहिवाशांचं टेन्शन वाढलंय एव्हढं मात्र नक्की.