SSC-HSC Exam 2023 : दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान! एक चूक कराल तर होईल पाच वर्षांची शिक्षा

SSC-HSC Board Exam 2023 : राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे

Updated: Feb 6, 2023, 09:37 AM IST
SSC-HSC Exam 2023 : दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान! एक चूक कराल तर होईल पाच वर्षांची शिक्षा title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC-HSC Board Exam 2023) तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून (Board Exam 2023) विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाकडून या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दुसरीकडे दहावी बारावीच्या पेपर फुटीला ब्रेक लावण्यासाठी राज्य मंडळांना सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचना विद्यार्थ्यांना देखील शाळेत वाचून दाखवण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केल्यास परीक्षार्थीला पाच वर्ष परीक्षा देता येणार नाही असा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

याआधी इंजीनियरिंग, फार्मसीच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असतील. हाच धोका ओळखून शिक्षण मंडळाने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधातही आता फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेत मोबाईल क्रमांक टाकून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे.

महत्त्वाच्या सूचना कोणत्या?

महामंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका ,पुरवण्यात  आलेले आलेख, नकाशे,  लॉंग टेबल अनधिकृतपणे मिळवणे आणि त्याचा गैरवापर केल्यास पुढील एका परीक्षेसाठी प्रतिबंध केला जाईल

मंडळांने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा कक्षात जवळ बाळगता येणार नाही. त्याचा वापर करताना कोणी आढळलं तर त्या परीक्षार्थीवर परीक्षेवर प्रतिबंध घातला जाईल

उत्तर पत्रिकेत, पुरवणीत प्रक्षोभक भाषेचा वापर, शिवीगाळ किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक ,फोन नंबर मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे हा गैरप्रकार समजण्यात येईल. यासोबत अशा परीक्षार्थींवर कठोर कारवाई करण्यात येईल

विषयाशी संबंधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, उदाहरणार्थ गाणे, सिनेमाचा डायलॉग, कथा लिहिणे याही परीक्षार्थीला परीक्षेतून दूर करण्यात येईल

परीक्षा सुरू असताना इतर परीक्षाअर्थी सोबत उत्तरांच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधने, एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थींना तोंडी उत्तरे सांगताना सापडल्यास परीक्षेतून पाच वर्षासाठी डीबार केले जाईल