Love Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:लाही पेटवून घेतलं.आणि नंतर तरुणीला मिठी मारली.  

Updated: Nov 22, 2022, 09:45 AM IST
Love Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू title=

crime news : संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:ला पेटवून घेणारा गजानन मुंडे हा तरुण संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता. त्याचं तरुणीवर प्रेम होतं. पण, तरुणीनं लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तरुणीला पेटवलं आणि स्वत:लाही पेटवून घेतलं. आणि नंतर तरुणीला मिठी मारली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलाच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल

तरुणाने मिठ्ठी मारली. यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली असून ही तरुणी 50 टक्के भाजली. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण, जळीत प्रकरणात मृत गजानन मुंडे याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई वडिलांनी लग्न करण्यासाठी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब तरुणीने दिला आहे. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अधिक वाचा : नवले पूल येथे अपघात, अखेर  फरार चालकाला अटक )

तरुणीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, आरोप

दरम्यान, याआधीही तरुणीनं दोन वेळा पोलिसांत तक्रार केली होती. पण, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती अशी चर्चा सुरु आहे.

दोघांमध्ये प्रेमचे संबंध?

हे दोघे शहरातील शासकीय विज्ञान संस्थेतमध्ये पीएचडी करत होते. या दोघांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ओळख होती. या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध (Love Affair) असल्याचं सांगितले जात आहे. तरुणाने या तरुणीला लग्नाबद्दल विचारले होते, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र तरुणीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचीही माहिती आहे. तसेच या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. मात्र तरुणीने तरुणाला उधार घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिला. यावरुन हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.