Engineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम

Yavatmal News: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Updated: Dec 21, 2022, 04:28 PM IST
Engineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम title=
yavatmal news

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळच्या उमरखेड (Yavatmal) येथे कैलास शिंदे यांच्याकडे घरफोडी झाली होती ज्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 9 लाख 37 हजारांचा मुद्देमाल चोरी गेला होता, पोलिसांपुढे ह्यातील चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते. दरम्यान तपासात संशयावरून पोलिसांनी शिंदे यांचा भाचा अक्षय ढोले याला विचारपूस केली असता बिंग फुटले. अक्षय अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याला महागड्या गाड्या व इतर शौक आहेत. त्यातून एक लाखावर (Lakhs) उधारी त्याचेवर झाली. दरम्यान मामाने मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदी केले जे त्यांनी मोबाईल वरून बहिणीला दाखविले. ही बाब समजताच अक्षयने वेषांतर करून मामाचे घर फोडले व साडे नऊ लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला. (Crime News Bhanja Steal 9.5 Lakhs rupees from his mama house to buy bike)

काय घडली नेमकी घटना: 

48 किलो सोनं, 2 टोळी चांदी या विद्यार्थ्यांने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याचे अनेक शौक होते तेव्हा आपल्या मित्रांकडून त्यांने महागड्या गाड्या घेतल्या होत्या. त्यातून यासाठी आपली ही उधारी फेडण्यासाठी या मुलानं आपल्या मामाच्या घरी चोरी केली. त्याच्याकडे एकूण दोन लाखांच्यावर उधारी होती. त्यामुळे आपल्या पैसे फेडण्यासाठी त्यानं एकूण 9.5 लाखांची चोरी केल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं

घटना काही थांंबेना - 

घरफोडीच्या किंवा वारंवार हल्ल्याच्या घटना सध्या वाढू लागल्या आहेत. सध्या कल्याण भागातही अशी एक घटना पाहायला मिळाली आहे. कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिस ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाण वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण येथे बांधकाम व्यवसायकावर (Businessmen) जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, फायटर, लाकडी दंडुके यांनी केला जिवघेणा हल्ला केला. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.  

15 डिसेंबरला खडवली नडगाव येथील बांधकाम व्यावसायिक शैलेश लोणे हे टिटवाळा परिसरातील जयमल्हार धाब्यावर जेवणासाठी गेले इतक्यात चार ते पाच हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, फायटर, लाकडी दंडुके यांनी त्याच्या वर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शैलेश हे गंभीर जखमी झाले असून, डोक्यात टाके आणि हाताला फ्रॅक्चर झाले आहे. हा संपूर्ण थरारक प्रकार धाब्यातील CCTV कॅमेरॅत कैद झाला. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिसानी गुन्हा दाखल करत हा हल्ला का केला पुढील तपास पोलीस करीत आहें.सीसीटीव्ही च्या माध्यमातून पुढील तपास सुरू केला आहे मात्र या घटने परिसरात भीतीचे वातावरण आहे.