अमरावती: राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात आला आहे. मात्र आता अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढताना दिसत आहे. अमरावती जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लसचे 6 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरात आता काहीसं भीतीचं वातावरणही आहे. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने भीतीचं वातावरण आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, फ्लूसदृश आजारासंबंधी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर नागरिकांना काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सगळ्याची माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
ऑक्टोबरपर्यंत देशात तिसरी लाट येईल आणि त्यामध्ये मुलांना कोरोनाचा धोका अधिक असेल असं सांगण्यात येत आहे. मात्र WHO ने कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली.
जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्यात तिथे भारतात मात्र सध्या आणि पुढील काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरुपातल्या संसर्ग स्थितीत असल्याची शक्यता डॉ. स्वामीनाथन यांनी बोलून दाखवलीय. एन्डेमिक म्हणजे जिथे लोकं संसर्गासह जगणं शिकू लागतात. थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो.