मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) लवकरच मुलांवर Covovax Covid-19 लसीच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगीसाठी ड्रग कंट्रोलर आणि जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज करेल. कोव्होवॅक्स (Covovax) ही यूएस बेस्ड Novavax Incद्वारे विकसित केलेली COVID-19 लसची भारतीय आवृत्ती आहे आणि पुणे-आधारित एसआयआयद्वारे त्याची निर्मिती केली जात आहे.
कोवोवॅक्स (Covovax) ही सीरमने बनवलेली दुसरी लस आहे, पहिली म्हणजे ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका कोविड लस, ज्याला 'कोविशिल्ट' म्हणून ओळखले जाते, एसआयआयने भारतात बनवले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदार पूनावाला शुक्रवारी म्हणाले की Novavax Incद्वारे विकसित COVID-19 लस कोविव्हॅक्सची पहिल्या टप्प्यातील उत्पादन एसआयआयच्या पुणे प्रयोगशाळेत तयार केले जात आहे.
पूनावाला यांनी ट्वीट केले की, “Covovaxची पहिली तुकडी (Novavax Incद्वारे विकसित केलेली) या आठवड्यात पुण्यात आमच्या प्लांट येथे तयार होत असल्याचे पाहून मला आनंद झाला. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आमच्या भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्याची या लसमध्ये बरीच क्षमता आहे. चाचण्या सुरू आहेत. सीरम इंडिया टीमने चांगली कामगिरी केली आहे. '' त्यांनी कोव्होवॅक्स लसची क्लिनिकल चाचणी भारतात सुरु केली असून यावर्षी सप्टेंबरपर्यंत याची सुरूवात होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकन लस कंपनी नोव्हावाक्स इंक. ने कोविड-19च्या लससाठी NVX-COV-2373च्या विकास आणि व्यावसायीकरणासाठी परवाना कराराची घोषणा केली. यावर्षी जानेवारीत सीरम संस्थेने देशात कोविशिल्ट लस सुरू केली. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रॅजेनेका सहकार्य करून त्यांनी ही लस विकसित केली आहे.