Corona : राज्यात आज ६६,१९१ रुग्णांची वाढ, तर ६१,४५० जणांची कोरोनावर मात

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ कायम...

Updated: Apr 25, 2021, 09:42 PM IST
Corona : राज्यात आज ६६,१९१ रुग्णांची वाढ, तर ६१,४५० जणांची कोरोनावर मात title=

मुंबई : आज राज्यात कोरोनाचे ६६,१९१ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर ६१,४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,९८,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. पण आज राज्यात ८३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

राज्यात आतापर्यंत ३५,३०,०६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१९ एवढे झाले आहे. सध्या राज्यात मृत्यूदर १.५१% इतका आहे. आतापर्यंत २,५७,४९,५४३ जणाच्या कोरोना चाचण्या झाल्या असून ४२,९५,०२७ (१६.६८) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,३६,८२५ व्यक्ती होमक्वारंटाईन तर २९,९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२,९५,०२७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१    मुंबई मनपा ५४९८

२    ठाणे  १६५५

३    ठाणे मनपा १०८७

४    नवी मुंबई मनपा  ५९९

५    कल्याण डोंबवली मनपा  १४२५

६    उल्हासनगर मनपा ११६

७    भिवंडी निजामपूर मनपा ७२

८    मीरा भाईंदर मनपा ५६७

९    पालघर     ६६५

१०   वसईविरार मनपा  ९००

११   रायगड     १०५२

१२   पनवेल मनपा     ६६०

ठाणे मंडळ एकूण  १४२९६

१३   नाशिक     १७२७

१४   नाशिक मनपा    ३०५१

१५   मालेगाव मनपा   ३०

१६   अहमदनगर २३७४

१७   अहमदनगर मनपा ९०१

१८   धुळे  १८४

१९   धुळे मनपा  ९५

२०   जळगाव    ७४०

२१   जळगाव मनपा    १२०

२२   नंदूरबार    ७१५

नाशिक मंडळ एकूण     ९९३७

२३   पुणे  ३२७६

२४   पुणे मनपा  ४६५३

२५   पिंपरी चिंचवड मनपा    २२४५

२६   सोलापूर    १६३६

२७   सोलापूर मनपा    ३३९

२८   सातारा     १८७९

पुणे मंडळ एकूण  १४०२८

२९   कोल्हापूर   ७३९

३०   कोल्हापूर मनपा   २१०

३१   सांगली     ९१६

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   ३००

३३   सिंधुदुर्ग    २३४

३४   रत्नागिरी   ६४८

कोल्हापूर मंडळ एकूण   ३०४७

३५   औरंगाबाद   ९००

३६   औरंगाबाद मनपा  ९५३

३७   जालना     ६८८

३८   हिंगोली     २५१

३९   परभणी     ६९५

४०   परभणी मनपा    १४९

औरंगाबाद मंडळ एकूण  ३६३६

४१   लातूर ११५४

४२   लातूर मनपा ३१३

४३   उस्मानाबाद ८३२

४४   बीड  १२५४

४५   नांदेड ७०२

४६   नांदेड मनपा ३८९

लातूर मंडळ एकूण ४६४४

४७   अकोला     १६१

४८   अकोला मनपा    २४८

४९   अमरावती   ४३३

५०   अमरावती मनपा  २७२

५१   यवतमाळ   १५३९

५२   बुलढाणा    ३९२

५३   वाशिम     ३६९

अकोला मंडळ एकूण    ३४१४

५४   नागपूर     २८१६

५५   नागपूर मनपा    ५१३२

५६   वर्धा  ९६०

५७   भंडारा १३६४

५८   गोंदिया     ६२७

५९   चंद्रपूर १२६०

६०   चंद्रपूर मनपा ५६३

६१   गडचिरोली  ४६७

नागपूर एकूण     १३१८९

एकूण ६६१९१