आमच्या त्रासाचाही विचार करा, खासगी कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी

 तासनतास बसच्या रांगेमध्ये उभे राहून आणि प्रचंड गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे

Updated: Jun 17, 2020, 05:16 PM IST
आमच्या त्रासाचाही विचार करा,  खासगी कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी title=

कल्याण : ज्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करून त्यांना दिलासा देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे आमच्या त्रासाचाही शासनाने विचार करण्याची मागणी खासगी सेवेतील कर्मचारी, बँक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची केली आहे. 

वाढत चाललेले कोरोनाचे रुग्ण, मुंबईला जाण्यासाठी रस्ते वाहतुकीवर आलेला ताण, प्रवासाला लागणारा वेळ आणि त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती यामुळे अखेर मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र तासनतास बसच्या रांगेमध्ये उभे राहून आणि प्रचंड गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे. ट्राफिक जाममुळे दीड तासाच्या अंतरासाठी चार तास लागतं आहे. बसेस सुद्धा कमी असल्याने गर्दी होत आहे. इच्छा असूनही कोणालाच सामाजिक अंतर पाळणे शक्य होत नाहीये. एकीकडे आरोग्य आणि दुसरीकडे प्रपंच अशा दोन विचारांच्या तारेवर कसरत करत हे खासगी कर्मचारी सध्या प्रवास करत आहेत.

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही दिलासा द्या, आमचाही काही तरी विचार करा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.