अहमदनगरच्या जागेवरून तिढा, काँग्रेसचे सुजय राष्ट्रवादीतून लोकसभेच्या रिंगणात?

अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतला तिढा कायम आहे. जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे.  

Updated: Mar 5, 2019, 06:12 PM IST
अहमदनगरच्या जागेवरून तिढा, काँग्रेसचे सुजय राष्ट्रवादीतून लोकसभेच्या रिंगणात? title=
संग्रहित छाया

मुंबई : अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतला तिढा कायम आहे. जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची सुजय विखेंची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतला तिढा कायम आहे. राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नसल्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार का या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणची लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. या जागेवार आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हरत आली आहे. त्यामुळे आपण दोन वर्षांपासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत. ही जागा आपल्याच मिळावी, असा आग्रह सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे, सुजय विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात पंजाला मतदान करा, दक्षिणेत चिन्ह तुम्हाला लवकरच सांगतो, असे वक्कव्य करुन संभ्रम कायम ठेवला आहे.

निवडणूकीचं चिन्ह लवकरच सांगतो, सुजय विखे-पाटील यांच्याकडून सस्पेन्स कायम

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मोठा तिढा निर्माण झाला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढणार म्हणजे लढणार, असा पवित्रा सुजय यांनी घेतला आहे. ते मध्यंतरी भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा रंगत होती. आता तर ते राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. अहमनगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडचे राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवरांनी स्पष्ट केल्यामुळे विखेंची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.